लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही- मुख्यमंत्री
लोकसभा-विधानसभा निवडणूका एकत्र होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार अशा चर्चांना जोर आला होता. शेवटच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी लिहून देतो, लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही असे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस म्हटले आहेत. त्यामुळे लोकसभा-विधानसभा निवडणूका एकत्र होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणुका त्याच्या ठरलेल्या वेळीच होणार आहेत. लोकसभेसोबत निवडणुका होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी नागपुरात स्पष्ट केलंय. मंगळवारनंतर पुन्हा शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत विधासनभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा रंगली होती.निवडणूक आयोगाला एक महिना आधी कळवावे लागते, पण राज्य सरकारने तसे काही आयोगाला कळवले नसल्याचे काही आमदारांचे म्हणणे आहे. या संदर्भातील कोणती वाच्यताही सरकारतर्फे करण्यात आली नव्हती.