CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळ बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. तब्बल 7 वर्षांनंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह तब्बल 29 मंत्र्यांनी या बैठकीला उपस्थिती लावली. खासदार संजय राऊत या बैठकीला उपस्थिती लावणार असल्याची चर्चा सुरु होती. खुद्द राऊतांनी यासंदर्भात विधान केले होते.  दरम्यान पत्रकार परिषद सुरु असताना राऊत नाही आले का? असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर उपस्थित सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. पुढे काय झाले ते जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण महाराष्ट्रातले सर्वात ज्येष्ठ संपादक आहोत आणि त्यामुळेच शिंदे-फडणवीस-पवारांच्या पत्रकार परिषदेला इच्छा झाली तर जाऊ असं सूचक विधान संजय राऊतांनी केलंय. त्यामुळे शासनाच्या पत्रकार परिषदेला संजय राऊत पत्रकार म्हणून हजेरी लावणार का याची चर्चा सुरु होती. संजय राऊतांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेचा पास घेतल्याचीही चर्चा सुरु होती. संजय राऊत सध्या छत्रपती संभाजीनगरमध्येच आहेत.. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज कॅबिनेटची विशेष बैठक झाली.. त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली. याच पत्रकार परिषदेत जाण्यासंबंधी संजय राऊतांनी सूचक विधान केले होते. तर संजय राऊत शासनाच्या पत्रकार परिषदेत आले तर आपण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत जाणार असा पलटवार भाजप आमदार नितेश राणेंनी केला होता. दुसरीकडे मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे प्रस्ताव सादर करण्यात आले. कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आले. या बैठकीत आपण उपस्थित राहू शकतो असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यामुळे ही बैठक सकाळपासूनच चर्चेत होती. 


काय म्हणाले मुख्यमंत्री? 


मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे मुद्दे मांडल्यानंतर राऊत नाही आले का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला. त्यानंतर थोडावेळ थांबून मी एका माध्यमांचे प्रतिनीध राऊत यांच्याबद्दल विचारत असल्याचा खुलासा त्यांनी केला.