Pune Bypoll Election : कसबा-चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध? मुख्यमंत्र्यांचा मविआ नेत्यांना फोन...
Pune Bypoll Election : कसबा पेठ , चिंचवड पोटनिवडणूक (Kasba Peth and Chinchwad Bypoll Election) बिनविरोध करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
Pune Bypoll Election : कसबा पेठ - चिंचवड पोटनिवडणूक (Kasba Peth and Chinchwad Bypoll Election) बिनविरोध करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिंदे यांनी थेट शरद पवार (Sharad Pawar) , मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole) , विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना फोन केला आहे. ( Maharashtra political news)
राज ठाकरे यांचे चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीबाबत आवाहन
महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन केली आहे. मात्र राजकीय परंपरा पाळण्याचं आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी 'मातोश्री'वर मात्र फोन केलेला नाही. दरम्यान, ठाकरे गटाकडून गंभीर आरोप करण्यात आला आहे. विधानपरिषद निवडणुकीतल्या अपयशानंतर आता पोटनिवडणुकीतही अपयशाची शक्यता लक्षात आल्याने सरकारला निवडणुका घ्यायच्या नाहीत, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पण जनतेला निवडणुका हव्या आहेत त्यामुळे पोटनिवडणुका होतील,असे राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीनेही निवडणूक लढणार
पुण्यातील चिंचवड आणि कसबा पेठ येथील आमदारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणुकीची (Kasba and Chinchwad bypolls) घोषणा करण्यात आहे. त्यानंतर भाजपकडून दोन्ही उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. कसबा येथून भाजपने टिळक कुटुंबातून उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे टिळक कुटुंब नाराज आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीनेही निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही ही निवडणूक होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
उमेदवारी न मिळाल्याने टिळक कुटुंबीय नाराज
कसबा पेठ निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने टिळक कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केलीय. मुक्ता टिळक यांच्या सहका-यांनी जाण ठेवायला हवी होती असं शैलेश टिळक यांनी म्हटलंय. दरम्यान, उद्या कसबा मतदारसंघात भाजप शक्तिप्रदर्शन करणार आहे. कसबा पोटनिवडणुकीत हेमंत रासने उमेदवार अर्ज भरणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती ते दगडूशेठ गणपती मंदिर अशी पदयात्रा निघेल. त्यानंतर दुपारी १२ वाजता अर्ज भरला जाईल.