CM Eknath Shinde :  अखेर ठरलं...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) लवकरच अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आम्ही पुढे जात आहोत, असं सांगणारे एकनाश शिंदे दिवाळीनंतर अयोध्येचा (Ayodhya)दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबर महिन्यात अयोध्येला जाणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. अयोध्येत ते रामलल्लाचं दर्शन घेतील. शिंदे यांचा अयोध्या दौरा हे शक्तिप्रदर्शनच ठरण्याची शक्यता आहे. (CM Eknath Shinde to visit Ayodhya in November nmp)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांसह 'बाळासाहेबांची शिवसेना' गटाचे बहुतांश आमदारही अयोध्येला जाणार आहेत. शिवसेनेतलं बंड होण्याआधी शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) अयोध्या दौऱ्याची अयोध्येत राहून संपूर्ण तयारी केली होती. आता बंडानंतर ते मुख्यमंत्री या नात्याने अयोध्येला जाणार आहेत. दिवाळीनंतर मंत्रिमंडळचा विस्तार झाल्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजप गटाचे मंत्री अयोध्येत जाऊन शक्तीप्रदर्शन करणार अशी सूत्रांची माहिती आहे. 


दरम्यान अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे अर्धे काम पूर्ण झाले आहे. गर्भगृह आणि पहिला मजला डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. मंदिराला सागवान लाकडी दरवाजे असतील. मंदिरावर भूकंपाचा कोणताही परिणाम होणार नाही. दगड तांब्याच्या पानांनी जोडण्याचं काम सुरू आहे. आत 5 मंदिरं बांधली जातील. मंदिराच्या भिंती, पंचदेव मंदिर बांधण्यात येणार आहे. तसंच सूर्यदेव मंदिर आणि विष्णू देवता मंदिर बांधण्यात येणार आहे.पहिल्या मजल्यावर समोरच्या प्रवेशद्वारावर सिंहद्वार,नृत्य मंडप,रंग मंडप आणि गूढ मंडप बांधण्यात येणार आहे. त्यासमोर मंडप बांधण्यात येईल, असं मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 



पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 5 ऑगस्ट 2020 रोजी पायाभरणी केल्यानंतर अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला वेगाने सुरुवात झाली. अयोध्या भेटीदरम्यान 23 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींनी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राची पाहणी केली.