नागपूर : नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आलं. त्याला तत्वतः मंजुरी मिळाली आहे. लवकरच नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे अहवाल अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारसमोर ठेवण्यात येणार आहेत. ११ हजार २१६ कोटींच्या एकूण रक्कमेपैकी ६० टक्के रक्कम कर्ज म्हणून वित्तीय संस्थांकडून घेतली जाईल. तर केंद्र आणि राज्य सरकार २० २० टक्के वाटा देईल. नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं संपूर्ण काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होईल. तर पहिल्या टप्प्याचा काही भाग म्हणजे खापरी ते सीताबर्डी दरम्यान मेट्रो सेवा मार्च २०१९ पर्यंत सुरू केली जाईल. 


नाशिक शहरात मेट्रोसाठी राज्य़ सरकारने महामेट्रोला व्यवहार्यता अहवाल आणि विकास प्रकल्प अहवाल तयार करायला सांगितला आहे. महामेट्रोने ते काम सुरूही केलंय. व्यवहार्यता अहवाल फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर २ महिन्यात विकास प्रकल्प अहवाल पूर्ण केला जाईल.