कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : गोविंदा थर लावून हंडी फोडतात, मात्र आम्ही 50 थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला आहे. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले असून असेच थर यापुढे वाढत जातील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापुढे उत्सव जोरात साजरे करा पण काळजी घेऊन करा असं आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका उत्सवात जोरदार टोलेबाजी केली. स्टेजवर येताच यावेळचा गोविंदा जोरात आहे ना ? अशी साद त्यांनी गोविंदाला घातली. शिंदे पुढे म्हणाले, गोविंदाचा विमा पण दिला, लोकप्रतिनिधींनी खेळाच्या दर्जाची मागणी केली होत ती मान्य करण्यात आली असल्याचं ते म्हणाले.


अपघात होऊ नये याची काळजी घ्या. प्रो कबडी प्रमाणे पुढच्या वर्षी प्रो गोविंदा होईल आणि नोकरीत 5 टक्के आरक्षण मिळणार असल्याचे यावेळी मु्ख्यमत्र्यांनी सांगितलं.


टेंभी म्हणजे गोविंदाची पांढरी आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे. धर्म आणि संस्कृती जोपासण्याचे काम दिघे यांनी केलं. धर्मवारी आंनद दिघे बोले होते की ठाण्याचा मुख्यमंत्री झालो पाहिजे. दिघे यांचं स्वप्न आज पूर्ण झालंय असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


या उत्सवात सहाभागी झालो हे सर्वसामान्याचं सरकार आहे. उत्सव काळजी घेऊन साजरा करा, साथीचे आजार अजून गेले नाहीत काळजी घ्या .गणपती उत्सव देखील मोठया उत्सवात साजरे झाले पाहिजे, दोन वर्षे थांबलो. हा सण सर्वात मोठा सण असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


श्रद्धा कपूरने साधला मराठीत संवाद
टेंभी नाका दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने हजेरी लावली. विशेष म्हणजे श्रद्धा कपूरने या उत्सवात गोविंदांशी संपूर्ण मराठीत संवाद साधला. टेंभी नाक्याची दिघे साहेबांची दहीहंडी ही सर्वात मोठी आणि मनाची हंडी असल्याचे सांगत मला या उत्सवात बोलावल्याने मला अभिमान असल्याचं तिनं सांगितलं.


या उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थिती लावल्याने आपल्या सोबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचा विशेष आनंद असल्याचे तिने सांगीतले.