COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पनवेल : पनवेल महापालिका आयुक्तांवरचा सत्ताधार्‍यांचा अविश्‍वास ठराव मुख्यमंत्र्यांनी फेटाळलाय... आणि  मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्याच आमदारांना आणि नगरसेवकांना दणका दिलाय. पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्याविरोधात पनवेल महापालिकेतल्या सत्ताधारी भाजपाने 26 मार्च रोजी अविश्वास प्रस्ताव आणला होता. 


भ्रष्टाचार करणं, हुकूमशाहीनं वागणं, प्रशासनावर अंकुश न ठेवणं, जनतेमध्ये रोष निर्माण करणं असे आरोप सुधाकर शिंदे यांच्यावर करण्यात आले. 


याप्रकरणी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपाच्या नगरसेवकांसह हा ठराव संमत करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. तर शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी विरोधात असलेल्या शेकापच्या नगरसेवकांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. 


सत्ताधारी भाजपाचाच प्रस्ताव फेटाळताना सरकारने आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. आयुक्तांनी कोणताही भ्रष्टाचार केला नसून महापालिकेचं आर्थिक नुकसान केलं नसल्याचं मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या नगरविकास विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयात म्हटलंय. 


हा एकप्रकारे पनवेलमधील भाजपाला आणि आमदार प्रशांत ठाकूर यांना दणका मानला जातोय.