मुंबई : महाराष्ट्र राज्य कोरोनाच्या संकटात दिवसेंदिवस अधिक खोल जाताना दिसत आहेत. दररोज इथल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वेळोवेळी जनतेसमोर येऊन माहिती देत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या संयमी नेतृत्वार संपूर्ण महाराष्ट्रातील जनता प्रभावीत आहे. याच पार्श्वभुमीवर ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणारा संदेश सोशल मीडियात व्हायरल झाला. तो मुख्यमंत्र्यांपर्यंत देखील पोहोचला. याला उत्तर म्हणून मुख्यमंत्र्यांनी सिंधुताईंना फोन केला. यावेळी दोघांमध्ये भावनिक संवाद झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला व्हॉट्सएपवर तुमच्या शुभेच्छा मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर बोल...बाळासाहेबांच्या पिल्ल्या बोल..असे सिंधुताई म्हणाल्या. ही कसोटी असून तू याला धीराने तोंड देतोयस..असंही सिंधुताई मुख्यमंत्र्यांना म्हणाल्या. 



तुम्ही आयुष्यभर कसोटी देताय असे उत्तर त्यांनी दिले. 


एवढा साधा मुख्यमंत्री, कुठेही बदल नाही तुझ्यात...महाराष्ट्राचे रक्त खंबीर आहे...किती आव्हानं आहेत तुझ्या समोर...असे त्या म्हणाल्या. 


तुमचे आशीर्वाद आहेत ना..मी सर्व जबाबदारी पार पडणार..असे मुख्यमंत्री म्हणाले. तुम्ही काळजी घ्या..घरातून बाहेर जाऊ नका.. असेही ते म्हणाले.


जगाची काळजी तुझ्यावर आहे...महाराष्ट्राची जबाबदारी तुझ्यावर आहे..नीट काळजी घे..मीनाताईचं दुध आहे तुझ्यात...काही हरणार नाहीस..असा आपुलकीचा विश्वास देखील सिंधुताईंनी व्यक्त केला.