नाशिक : निर्भया प्रकरण जलदगतीनं चाललंय का ? असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीचा दोर आजही लटकत असल्याचे देखील म्हणाले. नाशिक न्यायालयाच्या प्रस्तावित आधुनिक इमारतीच्या भूमीपुजन कोनशीला अनावरण प्रसंगी वकील परिषदेच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. यावेळी ते बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


जलद न्याय व्हावा यासाठी या वकील महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील वकिलांची वकील परिषद होते आहे. न्यायालयाच्या दृष्टिकोनातून कर्मचार्‍यांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर झालेला नाही. त्यामुळे याबाबतीत आणि न्यायालयीन पायाभूत सुविधा आणि प्रक्रियेच्या सुधारणांबाबत मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.