अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी हातात कागद न घेता वीज बिल (Electricity Bill) या विषयावर भाषण करून दाखवावं, क्रॉस सबसिडी (Cross Subsidy) म्हणजे काय ते सांगावं, असं आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलय. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली म्हणजे माझं काम भागलं अशा पद्धतीने मुख्यमंत्री काम करत असल्याची टीका पाटील यांनी केली आहे. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघासाठी चंद्रकांत पाटील घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. या निवडणुकीत भाजपचा विजयी होणार असा दावा त्यांनी केला आहे. आमचं सरकार जाणार नाही असं म्हणता मग बोंबलता तरी कशाला ? असा टोला पाटलांनी  महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांना लगावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पदवीधर निवडणुकीत(Graduate Election) चुरस बिलकुल नाही. त्यामुळे आम्हीच विजयी होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हिंमत असेल तर त्यांनी स्वतंत्र लढावं, कोण विजयी होतं ते बघाच असे आव्हान देखील त्यांनी दिले. 



जयंत पाटील म्हणतात भाजपला गांभीर्याने घेऊ नका. जनतेनं तुम्हाला गांभीर्याने घेतलं नाही म्हणून विधानसभेला तुमच्या ५४ आल्या आणि आमच्या १०५ आल्या. आमच्या पक्षात फसवणूक, बेरकेपणा, पाठीत खंजीर खुपसणे या गोष्टी नाहीत असे पाटील म्हणाले. 


नेता सगळ्यांना सोबत नेणारा असतो मात्र मुख्यमंत्री म्हणतात तुमचं तुम्ही बघा. शाळा सुरू करण्याबाबत सरकार संभ्रमात आहे. एक जानेवारीपासून शैक्षणिक वर्ष सुरू करावं अशी आमची भूमिका असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.