मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती हल्लाबोल केला आहे. भाजपनं शिवसेनेला वापरून घेतलं. बाबरीनंतर शिवसेनेची लाट उसळली होती. बाबरीनंतर ठरवलं असतं तर शिवसेनेचा पंतप्रधान असता. भाजपनं वचन मोडलं म्हणून आम्ही वेगळं घर केलं. आम्हाला गुलामासारखं वागवण्याचं स्वप्न मोडलं असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपनं शिवसेनेला वापरलं आणि फेकून दिलं. शिवसेनेची 25 वर्ष युतीत सडली, अशी टीका करतानाच भाजपनं वचन मोडलं म्हणून नवा घरोबा करावा लागला, असं स्पष्टीकरण त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना दिलं. बाबरी पाडल्यानंतर देशात शिवसेनेची अशी लाट आली होती की, तेव्हाच सीमोल्लंघन केलं असतं तर शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता.



स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे मोठी नेते उतरत नाहीत, याबद्दल त्यांनी यावेळी कानउघाडणीही केली. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रविवारी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांशी संवाद साधत असताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानपदावरून केलेल्या विधानची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.