मुंबई / पुणे : पुण्यातील सीरमच्या (Serum Fire) आगीत 5 जणांचा बळी गेला आहे. 5 जणांपैकी दोघे पुण्यातील रहिवासी आहे. तर 3 जण यूपी, बिहारचे नागरिक आहेत. या पाच निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या (Serum Institute ) इमारतीला लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या इमारतीचं बांधकाम सुरू होते. त्यामुळे मृतांमध्ये बांधकाम मजूर असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केलीय. ही आग वेल्डिंग किंवा विजेच्या कामामुळे लागल्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव टाकरे हे आज सीरमला भेट देणार आहेत. (CM Uddhav Thackeray to visit Serum Institute today)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातल्या सीरमच्या इमारतीत लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना सीरमचे चेअरम सायरस पुनावाला यांनी मदत जाहीर केली आहे. पाचही मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाखांची मदत देण्याची घोषणा पुनावालांनी केली आहे. हे सर्वजण कंत्राटी मजूर असल्याची माहिती समोर आली आहे.  


SII साठी अत्यंत दु:खद दिवस आहे. आम्हाला अतिशय दुःख झाले आहे आणि मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. नियमानुसार या कुटंबांनी जी मदत मिळायची आहे ती मिळेलच, मात्र त्या व्यतिरिक्त आम्ही प्रत्येक कुटुंबास २५ लाखांची मदत देत आहोत, असे सायरस पुनावाला यांनी जाहीर केले आहे.


मुख्यमंत्री आज सीरमला देणार भेट, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाखांची मदत CM Uddhav Thackeray to visit Serum Institute today, Cyrus Poonawalla's donates Rs 25 lakh each to families of deceased


दरम्यान, पुण्यातल्या सीरमच्या इमारतीला लागलेल्या आगीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आज विविध पथके दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर आगीबाबत निष्कर्ष काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वेल्डिंग आणि शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आताच वर्तवता येणार नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. तर बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे आग भडकल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. 


सीरमच्या आगीत आगीत प्रतिक पाष्टे (डेक्कन पुणे), महेंद्र इंगळे (पुणे) रमाशंकर हरिजन (उत्तर प्रदेश),  बिपीन सरोज (उत्तर प्रदेश) सुशीलकुमार पांडे (बिहार) या पाच जणांचा मृत्यू झाला आहे.