Jalgaon Kobra Snake News : ...म्हणून आईला देवाचं रुप मानतात. आपल्या पिल्ल्यांसाठी आई यमराजाशीही लढून त्यांचे प्राण परत आणते. नऊ महिने ज्या गोळ्याला पोटात वाढवलं त्याचा जन्मानंतर ती त्याला जीवापाड जपते. जेव्हा बाळाचा जीव धोक्यात असतो तेव्हा आई कसलीही पर्वा न करता त्याचा जीवासाठी लढते. अशी एक घटना समोर आली आहे. नेहमी प्रमाणे ती 4 महिन्याच्या तान्हुल्याला घेऊन झोपली होती. पहाटे वेळ अचानक बाळाचा आक्रोश तिच्या कानावर पडतो. तिला खडबळून जाग येते. बाळा भूक लागली असेल असा तिचा समज असतो. पण ती डोळे उडते अन् काय पाहते...चिमुकल्याला नागोबाने विळखा घातलेला होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्षणाचाही विलंब न करता आईने नागाला पडकलं आणि बाजूला फेकून दिलं. पण हे करत असताना तिला नागाने दंश केला. बाळाचे जीव तर या शूर आईने वाचविले पण ती सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नाला यश आलं आणि या मातेचे जीव वाचले. 



चित्रपटात आपण असे अनेक प्रसंग पाहिले आहेत, पण ही सत्यात घडलेली घटना जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील महिंदळे या गावात घडली आहे. या शूर मातेचं नाव ज्योती असून ती बाळंतपणासाठी महिंदळे गावात भिकन राजपूत आपल्या माहेरी आली होती. वडिलांकडे बाळाला घेऊन निर्भयपणे झोपलेल्या ज्योतीच्या आयुष्यात न कळत कोणाच्या धानी मनी नसताना एवढी मोठी धक्कादायक घटना घडली. (cobra snake  attack  four month baby mother saved the life snake bite mother jalgaon maharashtra news)


नागाच्या दंशानंतर ज्योतीची प्रकृती खालावत होती. कुटुंबियांने तिला तात्काळ ग्रामीण रुग्णालात दाखल केलं. पाच दिवस ज्योतीने मृत्यूशी झुंज दिली आणि परत आपल्या चिमुकल्यापाशी परतली. ज्योतीच्या या जिगरबाज धाडसाचं अख्ख गाव कौतुक करत आहेत. तिने आपल्या जीवाची पर्वा न करता बाळाचा जीव वाचवला. म्हणूनच म्हणतात ना आई ती आई असते, बाळासाठी ती यमाशीही दोनहात करते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)


उन्हाळ्यात जमीन तापल्यामुळे नाग, साप हे बिळातून बाहेर पडतात. त्यामुळे जंगल आणि सापाचा वावर असलेल्या गावांमध्ये अशा घटना घडतात. सापाचं नाव घेतलं तरी भल्या भल्या पैलवानालाही भीती वाटते. पण आपल्या लेकराचा जीव धोक्यात पाहून आईने क्षणाचा विचार न करता विषारी सापाला हात पडकून तिने तान्हुल्याचे जीव वाचवले.