Things Banned In Flight: कमीत कमी वेळात आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी विमान प्रवास हा सर्वात बेस्ट मानला जातो. विमान प्रवास महाग असला तरी वेळेची बचत होते. पण विमानातून प्रवास करत असताना काही नियम काटेकोरपणे पाळावे लागतात. जे लोक पहिल्यांदाच विमान प्रवास करणार आहेत त्यांनी आधीच हे नियम जाणून घ्यावी. विमानातून प्रवास करत असताना कोणत्या गोष्टी नेण्यास बंदी आहे. याची माहिती तुम्हाला असायला हवी. अन्यथा विमानतळावर गेल्यावर मोठी पंचायत होऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक फळ असं आहे जे तुम्ही विमान प्रवासादरम्यान नेऊ शकत नाही. तुम्ही देखील बुचकळ्यात पडलात ना. आपल्या रोजच्या वापरात असणारे फळ आपण विमानात घेऊन जाऊ शकत नाही, तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. असं कोणतं फळ आहे जे तुम्ही विमानात नेऊ शकत नाही. 


नारळ हे असं फळ आहे जे आपल्या रोजच्या वापरासाठी आणि धार्मिक विधींसाठी वापर केला जातो. श्रीफळाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होऊ शकत नाही. मात्र, तुम्ही विमान प्रवास करत असाल तर तुमच्या सोबत नारळ घेऊन जाऊ शकत नाही. आश्चर्य वाटलं ना पण यामागेही एक कारण दडलं आहे. विमान प्रवास करत असताना नारळसोबत नेण्यास मनाई आहे. 


विमान प्रवासात नारळ नेण्यास बॅन करण्यात आलं आहे कारण नारळ हा एक ज्वलनशील वस्तू आहे. त्यामुळं विमानतळावर चेक इन सामानात नेण्यास परवानगी नाकारली जाते. त्याचबरोबर तुम्ही नारळाच्या करवंट्यादेखील नेऊ शकत नाही. त्याचबरोबर विमान प्रवास करत असताना अमली पदार्थ सारखे सिगारेट, तबांखू, गांजा, दारूसारखे पदार्थ नेण्यासही मनाई आहे. तर अनेक फ्लाइटमध्ये 100 मिलीपेक्षा जास्त द्रवपदार्थ नेण्यास मनाई आहे. 


सेल्फ डिफेन्स आयटमसारखे पेपर स्प्रे, काठी सारख्या वस्तूही तुम्ही विमानप्रवासात नेऊ शकत नाही. त्याचबरोबर रेजर, ब्लेड, नेल फाइलर आणि नेल कटर सारख्या वस्तू तुमच्याकडे असतील त्यादेखील चेक इन करताना तुमच्याकडून काढून घेतल्या जाऊ शकतात.


परदेस प्रवास करत असताना मांस, भाज्या सारख्या वस्तू नेऊ शकत नाही. तुम्ही ज्या देशात जात आहेत तिथले नियम एकदा वाचून घ्या. कारण काही देशांमध्ये मांस, झाडे, फळ, भाज्या नेण्यावर बंदी आहे. जर तुम्ही हे घेऊन जात असाल तर चेक इन करतानाच ते जप्त केले जाते.