नंदूरबार : धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील थंडी आता जीवघेण्या स्तरावर जाऊन पोहचली आहे. या दोन्ही जिलूह्यात गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा ९ अंशा पर्यत खाली आला आहे. याच थंडीचा कडाका कायम असल्याने नंदूरबार तालुक्यात थंडीने दोघांचे बळी घेतले आहेत. 


थंडी कायम राहणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नंदूरबारमध्ये उघड्यावर झोपलेल्या राजू दाजमल भिल, देवीसिंग ठाकरे यांचे मृतदेह आढळलेत. तर थंडीने गारठून त्यांचा मृत्यू झाल्याची नोद नंदूरबार तालुका पोलिसात करण्यात आलीय.  जिल्ह्यातील तापमानात लक्षणीय घट झालीय. थंडी पासून बचाव करण्यासाठी नागरिक उबदार कपडे आणि शेकोटीचा आधार घेत आहेत..तर अजून दोन दिवस जिल्ह्यात थंडीचं प्रमाण हे असच कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.


उत्तर भारतातून थंडीची लाट


उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे आता राज्यातला पाराही घसरू लागला आहे. आज नाशिक जिल्ह्यातल्या निफाडचं तापमान आठ अंशापर्यंत खाली आलंय. महाबळेश्वरमध्ये पारा ८.८अंशावर घरसलाय. 



नाशिकही गारठलं


उत्तर भारतात गेल्या आठवड्याभरात तापमान सातत्यानं कमी होत आहे. गेल्या काही दिवसात त्याचा परिणाम राज्यातही दिसू लागलंय. आज निफाडमध्ये यंदाच्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. इकडे नाशिकमध्येही किमान तापमान ८.२ अंश नोंदवण्यात आलंय.