नाशिक : तापमानाचा पारा खाली घसरल्यानं नाशिक जिल्ह्यामधल्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे काढणीला आलेल्या द्राक्षांना तडे जात असून, यामुळे द्राक्ष उत्पादक आर्थिक संकटात सापडत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्ष बागांचं मोठे नुकसान झालं असतानाच, गेल्या तीन-चार दिवसांपासूनच्या वाढत्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत. 


थंडीपासून बचावासाठी द्राक्ष बागांवर औषधांची अतिरिक्त फवारणी करावी लागू नये याकरता उत्पादक दक्षता घेत आहेत. यासाठी शेतकरी रात्री बागेत काही विशिष्ट अंतरावर शेकोटी पेटवून द्राक्ष घडांसाठी उबदार वातावरण तयार करत आहेत.