Weather Report: सध्या सगळीकडेच गुलाबी थंडीचे (Cold weather) वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे आता सगळ्यांच्याच घरी शकोटी पेटणं सुरू झालं आहे. थंडीमुळे अनेक ठिकाणी बाहेर जोरजोरात वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक भागात थंडीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता सगळीकडेच थंडीसाठी काळजी घेतली जाते आहे. उत्तरेकडून हिमालयाच्या (Himalaya) पायथ्यापासून थेट थंड वारे नाशिकच्या दिशेने वाहत असल्याने निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 8.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची राज्यात निच्चांकी नोंद झाली आहे किमान तापमानाच्या पाऱ्यात घसरण झाल्याने निफाडकरांना थंडीमुळे हुडहुडी (Cold Wave in Maharashtra) भरली आहे. (cold wave maharashtra faces low tempreture in different places report says)


ठिकठिकाणी थंडीला सुरूवात : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परभणी (Parbhani) जिल्ह्याच तापमानही आज घसरलं असून ते 10.1 सेल्सिअसवर जाऊन पोहोचलं आहे. हे यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान आहे. जिल्ह्यात गुलाबी थंडी पडू लागली असून नागरिकांची पहाट उशिराने होऊ लागली आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या असून मॉर्निंग वॉक (Morning walk) करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. 


धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा गेल्या तीन दिवसांपासून सतत खाली येत आहे. गेल्या 24 तासांमध्ये तापमानाने निश्चयांचे पातळी गाठली आहे. धुळे शहरातील कृषी महाविद्यालयात 8.2°c नीचांकी तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक कमी तापमान (Tempreture) आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानामध्ये घट होत आहे. उत्तर भारतात (North India) पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा परिणाम हा धुळे आणि नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. येणाऱ्या काळामध्ये थंडीचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिक आता शेकोटीचा सहारा घेताना दिसून येत आहेत. शहरी भागामध्ये जनजीवन विस्कळीत झाला असून रात्री रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.


हेही वाचा - पुण्यात चाललंय काय? नातेवाईकच ठरतायत भक्षक; पोटच्या पोरीसोबतच त्या तिघांनी...


सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर मध्ये देखील थंडी वाढली असून पारा 11 अंशावर आला आहे. महाबळेश्र्वर येथील वेण्णा लेक या तलावाचा भागात पारा अजून खाली आला असून त्याठिकाणी तापमान 8 अशांवर आले होते. एकूणच गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात थंडी वाढत चालली आहे.


उबदार कपड्यांची मागणी वाढली : 


नाशिकचा पारा 48 तासात पंधरा अंशावरून थेट दहा अंशापर्यंत घसरला आहे. गेल्या 24 तासात नोंदवण्यात आलेल्या कमाल तापमानाचा पारा केवळ 10.4 आहे त्यामुळे नाशिक शहरात गुलाबी थंडीचं आगमन झाला आहे. शुक्रवार संध्याकाळपासून थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. त्यामुळे उपचार कपड्यांची (demand of warm clothes) मागणी वाढली आहे, नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात हाच पारा निफाड तालुक्यात 8 अंशापर्यंत खाली घसरल्याने द्राक्ष पिकांना धोका निर्माण झाला आहे, परिणामी नागरिक स्वतःला उब देण्यासोबत आता द्राक्ष पिकातही शेकोटी पेटू लागले आहेत.