सांगलीच्या हळदीला सामूहिक पेटंट, गणेश हिंगमिरेंच्या प्रयत्नांना यश
साठवणुकीच्या इतर प्रकारांमध्ये पेवाना अधिक मागणी असते...
सांगली : सांगलीच्या हळदीला सामूहिक पेटंट मिळलं असून प्राध्यापक गणेश हिंगमिरे यांच्या पाठपुराव्याला यश आलंय. या पेटंटमुळे सांगली जिल्ह्यातील हळद घेणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सांगलीच्या हळदीला भौतिक संपदेचा दर्जा मिळाला असून या संदर्भातलं प्रमाणपत्र लवकरच मिळणार आहे. शंभर वर्षांपासून हरिपूरच्या पेवां जमिनीत हळद साठवली जातेय. चिकट गाळमातीचे वैशिष्टे लाभलेल्या हरीपुरातील पेवांमध्ये हळद तीन वर्षापर्येंत सुरक्षित राहते. प्राणवायू अभावी या ठिकाणी हळदीला कीड लागू शकत नाही.
त्याशिवाय हळदीचे वजन वाढवू त्याचा रंगही खुलतो. या ठिकाणी हळदीची गुणवत्ता चांगली रहाते. त्यामुळेच साठवणुकीच्या इतर प्रकारांमध्ये पेवाना अधिक मागणी असते.
हिंगमिरे यांनी २०१३ ला हळदीला पेटंट मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांच्या अर्जाला विरोध झाला होता. पेटंट मिळवण्यासाठी वैज्ञानिक आधार गरजेचा होता.
अखेर सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर अखेर जवळपास पाच वर्षांनंतर सांगलीच्या हळदीला 'सामूहिक पेटंट' मिळवण्यात यश आलंय. या पेटंटमुळे शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना फायदा होणार आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये फसवणुकीचे प्रकार कमी होतील आणि गुणवत्ता असलेली हळद खरेदी करता येणार आहे.