मुंबई : राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येतेय. राज्यातील अनेक ठिकाणी शाळा सुरु झाल्यानंतर आता महाविद्यालय कधी सुरु होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. आता राज्यातील महाविद्यालये आजपासून सुरु होणार आहेत. पण मुंबई आणि एमएमआर विभागातील महाविद्यालयांना यातून वगळण्यात आलंय. इतर ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करुन महाविद्यालये सुरु राहतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई आणि एमएमआर विभागातील महाविद्यालये सुरु करण्याची परवानगी अद्याप देण्यात आली नाही. इथल्या कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेऊन पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे.ठाणे जिल्ह्यात सर्व महानगरपालिका क्षेत्र वगळून अंबरनाथ बदलापूर कुळगाव नगरपरिषद वगळून उर्वरित ग्रामीण क्षेत्रात शहापूर व मुरबाड असल्या नगरपंचायत क्षेत्रात महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 



महाविद्यालये सुरु होणार असली तरी यासाठी विेशेष नियमावली आखून देण्यात आलीय. याचे पालन करणे महाविद्यालय प्रशासनासाठी अनिवार्य असणार आहे.५० टक्के रोटेशन पद्धतीने आजपासून महाविद्यालये सुरू राहतील.