Badlapur To Navi Mumbai: बदलापूर ते नवी मुंबईपर्यंतचा प्रवास आता अधिक सोप्पा होणार आहे. रहिवाशांना आता अवघ्या 20 मिनिटांत हे अंतर पार करता येणार आहे. वडोदरा-जेएनपीटी राष्ट्रीय राजमार्गाचे काम सुरू आहे. मात्र, गेल्या काही कारणास्तव हे काम कित्येत वर्षांपासून थांबले आहे. मात्र, आता या कामाला पुन्हा गती मिळाली आहे. वडोदरा-जेएनपीटी मार्ग पुढच्या वर्षांत सुरू होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच, या मार्गामुळं वाहतुक अधिक सोप्पी होणार आहे. (Badlapur-Navi Mumbai)


20 मिनिटांत अंतर पू्र्ण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बदालपूर पूर्व बेंडशील या गावातून हा महामार्ग जातो. बदलापूर आणि नवी मुंबईला जोडणारा एक बोगदा प्रस्तावित आहे. या बोगद्याचे काम जवळपास 50 टक्के पूर्ण झाले आहे.  या बोगद्यामुळं बदलापूर-नवी मुंबईचे अंतर 20 मिनिटांत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे, कल्याण तालुक्यातील रायते आणि बदालपूरमधील बेंडशील गावात या बोगद्याचे काम सुरू आहे. 


चार शहरांना एकत्र जोडणार


एकदा का या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले की बदलापूर शहराला नवी मुंबई, मुंबई, पालघर आणि गुजरातसारख्या प्रमुख शहरांना एकत्र जोडण्यात येणार आहे. यामुळं प्रवासाचे अंतर तर कमी होईलच पण त्याचबरोर आर्थिकसंधीदेखील उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर बदलापूर एक लॉजिस्टिक हब आणि औद्योगिक क्षेत्रदेखीलही नावारुपास येणार आहे. 


कनेक्टिव्हिटी वाढणार


महाराष्ट्रात वडोदरा-जेएनपीटी राष्ट्रीय राजमार्ग प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. ज्यात 189 किमी लांबीचा आणि 120 मीटर रुंदीचा आठ पदरी राजमार्ग उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर बदलापूर शहराला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. ज्यामुळं ठाणे ग्रामणी क्षेत्रात हे शहर आर्थिकदृष्ट्या प्रमुख होईल. त्याचबरोबर या राजमार्गामुळं कनेक्टिव्हिटीदेखील वाढणार आहे. ज्यामुळं रहिवाशी आणि गुंतवणुकदारांचाही फायदा होणार आहे. 


वसई-भाईंदर 15 मिनिटांत 


वसई विरार व मीरा भाईंदर शहरातील अंतर कमी करणारी रो रो सेवा आज पासून प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली आहे. या सेवेमुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्दीसेस प्रा. लि. यांच्या मार्फत चालविली जाणाऱ्या या जान्हवी या फेरीबोटीची क्षमता ३३ वाहने व १०० प्रवाशी इतकी असणार आहे. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटाचा हा समुद्री मार्ग असणार आहे. ही सेवा ३ महिन्याच्या प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आली असून भरती व आहोटीच्या वेळी या फेरीबोटीच्या मार्गात बदल होणार असल्याची माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाकडून देण्यात आली आहे.