रत्नागिरीचा राम रहीम, बाबाच्या लीला सोशल मीडियावर व्हायरल
रत्नागिरीत आता दुसरा राम रहीम बाबा निर्माण झालाय. पाटील बाबा या नावाने रत्नागिरीत प्रसिद्ध असणा-या या बाबाविरुद्ध सोशल मीडियात प्रचंड संताप व्यक्त होतोय.
रत्नागिरी : रत्नागिरीत आता दुसरा राम रहीम बाबा निर्माण झालाय. पाटील बाबा या नावाने रत्नागिरीत प्रसिद्ध असणा-या या बाबाविरुद्ध सोशल मीडियात प्रचंड संताप व्यक्त होतोय.
पूर्वी पोलीस खात्यात नोकरीला असणारा हा बाबा स्वत:ला आधुनिक युगातील स्वामी समर्थांचा अवतार समजत आपल्याच भक्तांना शिविगाळ करतो. रत्नागिरीतील झरेवाडी येथे मठ असणा-या या स्वयंघोषीत पाटील बाबाच्या एक एक लिला रोज सोशल मिडीयावर व्हायरल होतायत.
महिलांना अर्वाच्च शिवीगाळ करणा-या बाबाचा प्रताप आता सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय. रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात या बाबाच्या विरोधात आता महीलेने तक्रार दाखल केली आहे.
रत्नागिरीसह तळकोकणातील लोकांना लुबाडणारा हा बाबा गेल्या अनेक वर्षापासून नागरीकांना लुबाडण्याचं काम करीत होता. दरम्यान अंधश्रद्धा निर्मुलन समितीने देखील या बाबांच्या विरोधात दंड थोपाटलेत.