मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. असं असतानाही महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरूद्ध शासकीय आदेश न पाळल्यामुळे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फक्त ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र तुकाराम मुंढे २०० लोकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. याबाबत मनीष मेश्राम यांनी तक्रार केली आहे. 


हॉटेल रजवाडा पॅलेसमधील सभागृहात ३१ मे २०२० रोजी २०० लोकांच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी २०० लोकांच्या उपस्थितांना मंचावरून संबोधित केलं आहे. या कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्र शासनाचे दिलेले नियम पाळले नाहीत. यामुळे मेश्राम यांनी तक्रार केली आहे. 



कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात वाढत आहे. अशा वेळी मोठ्या प्रमाणात लोकांनी एकत्र येणं टाळलं पाहिजे. अशावेळी मुंढे यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून नियम मोडले असल्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे.  


तुकाराम मुंढे हे त्यांच्या कडक शिस्तीसाठी लोकप्रिय आहेत. दभार स्वीकारल्यानंतर मुंढेंनी नागपूर महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांची सुमारे ५० मिनिटं मीटिंग घेतली. त्यानंतर मेट्रोच्या कार्यक्रमाला तुकाराम मुंढे रवाना झाले. पहिल्याच मीटिंगमध्ये तुकाराम मुंढे यांनी उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांना सुनावले. मीटिंगमध्ये उशिरा आलेले चालणार नाही, असे स्पष्ट बजावले.