पुण्यात डीएसकेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
ठेवीदाराची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातले बिल्डर डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पुणे : ठेवीदाराची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातले बिल्डर डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
डीएसकेंकडून चार लाख ४० हजार रुपये, तक्रारदाराला मुदत ठेव आणि व्याजरुपात यायचे आहेत. मात्र मुदत उलटून आणि आश्वासनं देऊनही डीएसकेंनी त्याला पैसे परत केले नव्हते.