महाड, रायगड :  मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण  २०१८ पर्यंत पूर्ण करु, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली. येथील सावित्री नदीवरील नव्या पुलाचे लोकार्पण गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिसेंबर २०१८ पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं काम पूर्ण करणार असल्याचे गडकरी यांनी जाहीर केले. मात्र यासाठी राज्य सरकारने लवकर भूसंपादन करून देण्याच्या सूचना गडकरी यांनी यावेळी केल्यात. त्याचवेळी गडकरी यांनी फाईल्स दाबून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर जोरदार टोलेबाजी केली. 


दरम्यान, गडकरी यांच्या भूमिकेनंतर पुढच्या दोन ते तीन महिन्यात भूसंपादनाचं काम पूर्ण करण्याचें आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणचे भाग्य उजळणारा मार्ग ठरेल असे मुख्यमंत्री म्हणालेत. तसेच येत्या तीन वर्षांत रायगडचा विकास करु, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.


ठळकबाबी...


- मुंबई गोवा महामार्गाचे काम २०१८ पर्यंत पूर्ण करु -  फडणवीस.
- येत्या तीन वर्षात रायगडचा विकास करु -  फडणवीस
- महामार्गासाठी येत्या दोन ते अडीच महिन्यात सर्व जमीन संपादित करण्याचा प्रयत्न करु - फडणवीस.
- कोणत्याही परिस्थितीत १८० दिवसांत सावित्री पूल बांधून होईल, असे आश्वासन गडकरींनी दिलं होतं, मात्र १६५ दिवसांतच हे काम पूर्ण झाले - फडणवीस.
- सावित्री पूल नव्याने बांधून मृतांना श्रद्धांजली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.