समृद्धी प्रकल्पावरून नाशिक पुन्हा एकदा तापणार
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यात ७० टक्के जमीन साडे सातशे हेक्टर जमीन बाजारभावापेक्षा पाच पट रक्कम देऊन अधिग्रहित झाली आहे.
नाशिक: मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग साठी १० जिल्ह्यात आज पासून सक्तीचे भूसंपादन करण्यासाठी कायद्याने अधिसूचना लागू होत आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यात ७० टक्के जमीन साडे सातशे हेक्टर जमीन बाजारभावापेक्षा पाच पट रक्कम देऊन अधिग्रहित झाली आहे. पुढील एकवीस दिवसात शेतकऱ्यांना हरकती आणि सूचना सादर करता येणार आहेत. उर्वरित जमिनीचे सक्तीचे भूसंपादन केवळ चार पट रक्कम केले जाणार असक्याने विरोध अधिक वाढू शकतो .पुन्हा आंदोलनांनी नाशिक जिल्हा तापणार आहे.