पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या कार्यालयातला संगणक प्रशासनाने उचलून नेल्याचा प्रकार आज घडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चालू स्थितीत संगणक असताना गट नेता किंवा त्यांच्या स्वीय सहायकाला तसंच कार्यालयीन शिपाई यांना याबाबत कुठलीच कल्पना न देता प्रशासनाने हा उद्योग केला. 


सत्ताधाऱ्यांच्या राजकीय दबावातून तडकाफडकी चक्क संगणकच गायब केल्याचा आरोप मारुती भापकर यांनी केलाय. या संगणकावर बसून मारुती भापकर यांनी गेली काही महिने भाजपच्या भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवला. 


दुसरीकडे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संगणक तक्रारीवरून काढल्याचे म्हटलंय. संगणकाचा गैर वापर होत असल्याची तक्रार स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी केली. त्यानंतर हा आदेश काढल्याचे आयुक्तांनी म्हटलंय.