बीड : राज्यात कोरोनाचा  (Coronavirus) उद्रेक वाढताना दिसत आहे. त्याचवेळी मृत्यूचा आकडा वाढत असल्याने मोठी चिंता करण्यात येत आहे. बीड (Beed) जिल्ह्यात कोरोनाचा वाढला आकडा चिंताजनक असताना मृत्यूदर देखील वाढला आहे. यातच अंबाजोगाई तालुक्यात प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृतांची संख्याही वाढत असल्याने भयावह परिस्थिती आहे.  शनिवार आणि रविवार या दोनच दिवसात अंबाजोगाईत कोरोनामुळे मृत झालेल्या 30 रुग्णांवर नगरपरिषदेने अंत्यसंस्कार केले. (COVID-19 । Two day Funeral of 30 persons at Ambejogai)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा उद्रेक वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. बीडमधील आंबेजोगाईत कोरोनामुळे मृत झालेल्या 30 रुग्णांवर नगरपरिषदेने अंत्यसंस्कार केले. यात 28 जणांना मुखाअग्नी देण्यात आला तर दोन जणांचा दफनविधी करण्यात आला.  कोरोनाचे संकट अधिक गडत होत असताना एक चांगली बातमी म्हणजे दोन दिवसांत तब्बल 1800 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 


सध्या अंबाजोगाईतील स्वाराती आणि लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये मिळून हजार पेक्षाही अधिक कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. तर, अनेकजण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. दररोज शेकडो रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याचे चित्र दिलासादायी असले तरी दुसऱ्या लाटेतील मृत्यूंची आकडेवारी मात्र चिंतेत भर घालणारी आहे.


दरम्यान, याआधीही  याच महिन्यात पहिल्या आठवड्यात बीड ( Beed) जिल्ह्यात आंबेजोगाई येथे एकाचवेळी 8  जणांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. एकाच चितेवर आठ जणांना अग्निमुख देण्यात आला होता. आंबेजोगाई शहर कोरोनाचा  हॉटस्पॉट बनले आहे. मांडवा येथील स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आहे. येथे कोरोना बधितांबरोबर मृतांचा आकडा वाढू लागला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. एका रुग्णालयातील सात आणि एका कोविड सेंटरमधील एक अशा आठ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.