कोकणच्या गणेशभक्तांना सरकारकडून खुशखबर मिळणार?
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणा-या गणेशभक्तांच्या वाहनांना सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणा-या गणेशभक्तांच्या वाहनांना सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सरकारकडून गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी मिळणार असल्याचे संकेत मिळतायत. या संदर्भात सरकारनं बुधवारी बैठक बोलावली आहे.
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी देण्याचा प्रयत्न करु, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका लक्षवेधीला उत्तर देताना दिली.
गेल्या वर्षीही कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या छोट्या चारचाकी गाड्यांना टोलमुक्ती देण्यात आली होती. गेल्या वर्षी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट मिळावी, यासाठी वाहतूक पोलीस आणि आरटीओ कार्यालयातून विशेष पास देण्यात आले होते.
गणेशोत्सवात कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी जात असतात. त्यामुळे टोलमाफीचा निर्णय झाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.