रत्नागिरी सिंधुदुर्गमधील काँग्रेस उमेदवार बांदिवडेकरांबाबत प्रश्निचिन्ह!
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांच्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे नविनचंद्र बांदिवडेकराची उमेदवारी वादात सापडली आहे.
मुंबई : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांच्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे नविनचंद्र बांदिवडेकराची उमेदवारी वादात सापडली आहे. नविनचंद्र बांदिवडेकर हे सनातन संस्थेचे कोकण विश्वस्थ आहेत. दरम्यान, सनातन संस्थेने त्याचे एक छायाचित्रासह वृत्त प्रकाशित केले आहे. दरम्यान, बांदिवडेकर यांचा सनातन संस्थेशी सबंध नसल्याचा खुलासा काँग्रेसने खुलासा केला आहे. सनातनच्या कोणत्याही कार्यात त्यांचा सहभाग नाही. बांदिवडेकर सनातनची विचारधारा आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात आहेत आणि हा विरोध पुढेही कायम राहील, अशी माहिती प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
सनातनकडून प्रसिद्ध करण्यात आलेले छायाचित्र
सिंधुदुर्ग येथून काँग्रेसचे उमेदवार नविनचंद्र बंदिवडेकर यांचा सनातन संस्थेबरोबर काहीही संबंध नाही. त्यांनी सनातनच्या कार्यात भाग घेतलेला नाही किंवा त्यांच्याबाबत सहानुभूती व्यक्त केलेली नाही. भंडारी समाजाचे अध्यक्ष म्हणून पोलिसांनी संभाव्यपणे पूर्वग्रहण केलेल्या कारवाईच्या अफवांवर विचार करुन समुदायावर दबाव होता म्हणून ते चौकशीसाठी गेले होते. त्यांनी कायद्यानुसार कारवाईची मागणी केली होती. त्यांची चौकशी झाली मात्र, त्यात काहीही तथ्य निघालेले नाही. त्यांनी सनातन आणि त्यांच्या अनुयायांच्या विचारधारेला जोरदार विरोध केला आणि ते विरोध करत राहतील, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सनातनशी संबध असल्याचा आरोप होत असल्याने बांदिवडेकराची उमेदवारी वादात सापडली आहे. नविनचंद्र बांदिवडेकर हे सनातन संस्थेचे कोकण विश्वस्थ आहेत. इतकच नाही तर नालासोपारा बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी वैभव राऊत याला सोडवण्यासाठी त्यांनी मोर्चा काढल्याचीही चर्चा आहे. अशात काँग्रेसने बांदिवडेकरांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसची ही उमेदवारी वादात सापडली आहे. अशोक चव्हाण यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. बांदिवडेकरांचा सनातनशी कोणताही संबंध नाही. सनातनच्या कोणत्याही कार्यात त्यांचा सहभाग नाही. सनातनची विचारधारा आणि त्यांच्या विरोधात असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.