Pune Kasba Bypoll Election: पुण्यातील मतदान संपलं असलं तरी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी काही थांबायला तयार नाहीत.  कसबा पोटनिवडणुक (Kasba Bypoll Election) ही पुन्हा चर्चेत आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी कसब्यात येऊन पैसे वाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. काँग्रेसचे कसब्यातले उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी हा आरोप केला आहे (maharashtra politics). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांविरोधातही निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल करावी अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. तर, धंगेकरांचे आरोप बिनबुडाचे असल्याचा पलटवार भाजप उमदेवार हेमंत रासने यांनी केला आहे. 


भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंवर गुन्हा दाखल


कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदान केंद्रात भाजपचं उपरणं घालून मतदान केल्याने रासनेंवर कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिका-यांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांनी निवडणूक अधिका-यांकडे केली होती. त्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.आचारसंहिता असताना धंगेकरांनी उपोषण केलं होते. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


भाजपाच्या माजी नगरसेवकावर  पैसे वाटल्याचा आरोप झाल्यानंतर गुन्हा दाखल


भाजपाचे माजी नगरसेवक गणेश बिडकरांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. कसबा पेठ पोटनिवडणुकीत मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप बिडकरांवर आहे.. बिडकरांसह भाजपाच्या आणखी 3 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.. युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष फैयाज शेख यांनी याबाबत तक्रार दिली होती. भाजपाचे कार्यकर्ते आएशा कॉम्प्लेक्समध्ये पैसे वाटत असल्याची माहिती शेख यांना मिळाली होती. बिडकरांसह त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांच्या हातात मतदान स्लीप आणि पैसे असल्याचं शेख यांना आढळलं. बिडकरांना विचारणा केल्यावर आपल्याला मारहाण करण्यात आली असा आरोप शेख यांनी केलाय.


दरम्यान, भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. कसबा मतदारसंघात 41 % आणि चिंचवड मतदारसंघात 51% मतदान झाले.