मुंबई : सेलु नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला मोठा झटका लागला आहे. कारण नगराध्यक्षांसह इतर 20 राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत (Congress vs NCP) चांगलीच चढाओढ दिसणार आहे. (NCP Corporator Join congress)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीने काँग्रेसला झटका दिला होता. मालेगाव महापालिकेच्या (Malegaon Corporation) सर्व काँग्रेस नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मालेगावचा हा वचपा काँग्रेसने भरुन काढला. या शिवाय औरंगादाबाद, परभणी, नांदेड येथील राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.


जिंतुर आणि सेलु नगरपरिषदेतील (Jintur-selu Nagarparishad) नगराध्यक्षांसह इतर नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आता राष्ट्रवादीच्या भूमिकेके सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण राज्याच्या राजकारणात एकत्र असलेले दोन्ही पक्ष स्थानिक राजकारणात मात्र एकमेकांच्या विरोधात जाताना दिसत आहे. याचा परिणाम राज्याच्या राजकारणात होणार का?


काँग्रेसन आधीच स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक महापालिका निवडणुकीकडे देखील मतदारांचं लक्ष लागून आहे.