संभाव्य खातेवाटपावर बाळासाहेब थोरात म्हणतात..
काळपर्यंत संभाव्य खातेवाटप होईल असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
मुंबई : आज संध्याकाळपर्यंत संभाव्य खातेवाटप होईल असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. काँग्रेसकडे कमी महत्वाची खाती तसेच काँग्रेसमुळे खातेवाटपाला उशीर होत असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. आमच्या वाट्याला महत्वाची खाती असून त्याप्रमाणे वाटप करत असल्याचे ते म्हणाले.
नापास झालेल्या विद्यार्थांचे सरकार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केला होता. याला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिले आहे. सत्ता स्थापन करण्यात फडणवीस सरकार नापास झाले. नापास झालेला विद्यार्थी कधी म्हणतो का मी अभ्यास केला नाही ? ते त्यातले विद्यार्थी आहेत. असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
माझं तिकिट कापण्यामागे फडणवीस-महाजन असल्याचा गंभीर आरोप भाजप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलाय. तसेच खडसे हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या देखील चर्चा आहेत. यावर देखील बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना टार्गेट केले. भाजपचे प्रमुख नेते आरोप करत असतील तर नापास विद्यार्थाने याचा अभ्यास करावा असा टोला त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.