मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे डावपेच नाही पण सगळ्यांना सामावून घेण्याची वृत्ती आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरेंचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कौतुक केलंय. तर काँग्रेस सोडून गेलेले बरेच जण परत यायला उत्सुक आहेत. ती लोक भाजपत दु:खी आहेत. पण काही दिवस दु:ख करू द्या असा टोला विखे पाटलांना लगावलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


एनआरसीच्या मुद्याबाबत कॉंग्रेस आणि शिवसेनेत मतभेद असल्याचं समोर आलंय.


याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय.


तर एनआरसी,सीएए, एनपीआरबाबत महाविकासआघाडीचे सर्वोच्च नेते अंतिम निर्णय घेतील असं अजित पवार म्हणालेत.