Political News : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक मोठी घटना घडणार असल्याचं चित्र आहे. सध्याच्या घडीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचं काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपद अडचणीत आल्याची चर्चा सुरु झाली आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीतील निष्क्रियता आणि नाना पटोले यांच्यासोबतचा वाद या पार्श्वभूमीवर पक्षाकडून ही कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. (congress leader Balasaheb Thorats post As Group Leader might be in Trouble latest Marathi news )


हेसुद्धा वाचा : Crime News : उधारी वसुल करण्याची तालिबानी पद्धत; पैशांसाठी माय लेकाची ही काय अवस्था केलेय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीनंतर यासंदर्भातील निर्णय होईल अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. थोरात यांनी पटोलेंसोबत काम करणं अशक्य असल्याचं पत्र काँग्रेस अध्यक्षांना पाठवल्यामुळे पक्षांतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. ज्यामुळं काँग्रेसमधली गटबाजीही उघड झाली आहे. थोरात आणि पटोले हे दोन्ही नेते राहुल गांधींचे निकटवर्तीय आहेत. असं असल्यामुळं काँग्रेस या दोघांमधील वाद मिटवणार की दोघांवरही कारवाई करणार याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा आहेत. बरं, दोघांवर नाही तर  दोघांपैकी एकावर कारवाई होणार का असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.  


एका पत्रामुळं इतका गोंधळ... 


पदवीधर मतदार संघातून विजयी झाल्यानंतर सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एबी फॉर्मवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लक्ष्य केलं. तर थोरातांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी पत्राद्वारे संपर्क साधत नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचं स्पष्ट कलं. आपल्याला मिळणारी वागणूक अपमानास्पद असून, परस्पर निर्णय घेण्यात येत असल्याचा आरोप थोरातांनी केला. ज्यामुळं पक्षात असणारा वाद जगासमोर आला. 


दरम्यान, नाना पटोले यांनी मात्र पत्राबाबत वेगळीच माहिती देत थोरात यांनी पत्र पाठवलं नसल्याचा दावा केला. बाळासाहेब थोरात यांच्याशी आपलं बोलणं झालं नसल्याचं म्हणत त्यांचं पत्र मिळालं तर मी त्याबाबत प्रतिक्रिया गेईन, असंही के म्हणाले.