MLA Raju Parwe in Shiv Sena Shinde Group : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर  विदर्भात काँग्रेसला मोठं भगदाड पडलं आहे.  काँग्रेस (Congress) आमदार राजू पारवे (MLA Raju Parwe) यांनी पक्षाचा हात सोडला आहे. राजू पारवे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजू पारवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजू पारवे हे काँग्रेसचे उमरेड येथील आमदार आहेत. मात्र, आता त्यांनी काँग्रेस पक्षाला राम राम ठोकला आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार , कृपाल तुमाने आणि आशिष जैस्वाल यांच्या उपस्थितीत राजू पारवे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.


शिवसेना पक्षात प्रवेश करताचा राजू पारवे यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले आहे. राजू पारवे शिवसेनेच्या तिकीटावर रामटेकमधून लोकसभा निवडणुक लढवणार आहेत.