पुणे : काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या कारला बुधवारी रात्री येथील 'बीएमसीसी' रस्त्यावरील त्यांच्या घराजवळ अपघात झाला. या अपघातात डॉ. कदम आणि त्यांचा चालक थोडक्यात वाचलेत. कारचे मोठे नुकसान झाले आहे. चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली, अशी प्राथमिक माहिती आहे. मी आणि चालक दोघेही सुखरूप असून, माझ्या डाव्या खांद्याला किरकोळ मार लागला आहे, असे डॉ. कदम यांनी सोशल माध्यमांतून सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार कदम मुंबईतील बैठक आटोपून पुण्यात येत होते. कार घराजवळच आली असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. 'एअरबॅग' उघडल्याने चालक आणि आमदार कदम हे दोघेही बचावले. डॉ. कदम यांच्या डाव्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे. 



या अपघातानंतर सर्व वैद्यकीय चाचण्या करून आमदार कदम गुरुवारी कराड येथील सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली. मुंबईहून परतताना कारला पुण्यात अपघात झाला. कार झाडावर आदळली. सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही. मी आणि चालक दोघेही सुखरूप असून माझ्या डाव्या खांद्याला किरकोळ मार लागला आहे, असे डॉ. कदम यांनी स्पष्ट केले आहे.