Video : `ब्राह्मणांची पोरं...`; काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांची फडणवीसांवर टीका करताना घसरली जीभ
खासदार धानोरकर यांनी ब्राह्मण समाजावर टीका करताना शिवराळ भाषा वापरल्यानेही नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
आशीष अम्बाडे, झी मीडिया चंद्रपूर : काँग्रेसच्या (Congress) ''आझादी का गौरव'' कार्यक्रमात बोलताना खासदार बाळू धानोरकर (Mp balu Dhanorkar) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यावर टीका करताना खासदार बाळू धानोरकर यांची जीभ घसरली.
ब्राह्मण समाजावर (Brahmin society) टीका करताना शिवराळ भाषा वापरल्यानेही नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
भाषणात बोलताना धानोरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना ''क्लिन चिट'' असे म्हणत टोलेबाजी केली. ब्राह्मणांची पोरं बदाम-खारका खातात आणि बहुजनांची जांभया देतात, असेही धानोरकर म्हणाले. मात्र याबाबत लगेचच त्यांनी सारवासारव केली.
काय म्हणाले बाळू धानोरकर?
"देवेंद्र फडणवीस यांना मानायला हवं. जन्माला यावं तर ब्राह्मणांच्या पोटी. ब्राह्मणांची पोरं बदाम-खारका खातात आणि बहुजनांची जांभया देतात, अशी परिस्थिती आहे," असे बाळू धानोकर म्हणाले.
दरम्यान, यानंतर खासदार बाळू धानोरकर यांनी याबाबत सारवासारव केली आहे. 'अशी काही काही लोकं असतात' असं धानोरकर यांनी शेवटी म्हटलं आहे.
बाळू धानोरकर लोकसभेत महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत. शिवसेनेतून काँग्रेस असा त्यांचा प्रवास आहे. याआधीही त्यांनी आपल्या वक्तव्यावरून वाद ओढवून घेतला आहे