मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीने माफी मागावी असे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. कोणत्याही विरोधी आमदाराला आमच्याकडून संपर्क केला गेल्या नसल्याचे ते म्हणाले. आमदारांच्या फोडाफोडीचा आरोप खोटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत भाजपा नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर मुनगंटीवार यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपावर केलेला घोडेबाजाराचा आरोप खोटा आहे. हा आरोप म्हणजे त्यांच्याच आमदारांचा आणि राज्यातील मतदारांचा अवमान आहे. कोणाला फोन आले असतील तर त्यांनी कॉल रेकॉर्ड काढावा आणि तो समोर आणावा. सरकार महायुतीचे बनेल यावर आम्हाला विश्वास आहे. जनादेशाच्या आधारावर सरकार बनेल असेही ते म्हणाले. 



कोणत्याही क्षणी कोंडी फुटेल असेल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. 


सत्तास्थापनेच्या ऐवजी मुख्यमंत्र्यांनी सर्व नेत्यांना एकत्र करुन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष देण्याच्या सुचना दिल्या.