मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे त्यांच्या विधानामुळे चांगलेच चर्चेत आहेत. बातमी नाना पटोले यांच्या संदर्भात आहे. पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा खळबळजनक आरोप केला होता. यावरुन टीकेची झोड उठवल्यानंतर आता  घूमजाव केलंय. तसेच भाजपवरही त्यांनी टीका केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले पटोले?  


"मी वादग्रस्त मुद्दे उपस्थित केलेले नाहीत, ज्यामुळे महाविकास आघाडीत वाद निर्माण होईल. याबाबतही शरद पवारांनी काल स्पष्ट केलं. सरकार आणि पक्ष दोन्ही वेगळ्या असतात. मी पक्षप्रमुख म्हणून पक्षाची बाजू माडंच राज्यभर फिरतोय. याला मोठ्या प्रमाणात लोकांकडूनही सर्मथन मिळतय. तसेच आमचा विरोधी पक्ष असलेला बीजेपीच्या चुकीच्या निर्णयामुळे देश बर्बाद व्हायला निघालाय. चीनसुद्धा आक्रमणाच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत भाजपला हे सर्व कळायला लागलंय. त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकतेय. त्यामुळे चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात. महाविकास आघाडीत कोणताही बिघाड नाही. तिनही पक्ष एकत्र काम करतायेत. यामध्ये कोणाचंही दुमत नाही ", असं पटोले यांनी नमूद केलंय. 


"ही रेग्युलर प्रोसस आहे. राज्यात काय घडतंय याची माहिती IBच्या माध्यमातून केवळ राज्य सरकार नाही तर केंद्रालाही जाते. त्यामुळे ही रेग्युलर प्रोसेस आहे. या प्रोसेसला वादग्रस्त म्हणयाचं कारण नाही.मात्र सरकार अस्थीर करण्यासाठी भाजप अशा बातम्या पसरवत आहे, असा आरोप नानांनी केला.