मुंबई : काँग्रेस प्रदेक्षाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यानंतर नानांवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. हा वाद शमतो न शमतो तोवर नानांनी आता मोदींबाबत (Nana Patole controversial statement on Naredra Modi) वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे नाना पटोले पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. (congress state president nana patole controversial statement on prime minister naredra modi at igatpuri nashik)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाना काय म्हणाले? 


"ज्याची बायको पळते त्याला मोदी म्हणतात", असं नाना पटोले यांनी म्हंटलंय. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा वादाला तोडं फुटलंय. ते नाशिकमध्ये बोलत होते. या विधानावरुन नानांवर भाजपकडून सडकून टीका केली जात आहे. नाशिकमधील इगतपुरीत मुंबई काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं. 


दरम्यान आता नाना पटोले यांच्या या वादग्रस्त विधानानंतर भाजप काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय.