सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे :  दहशतवाद्यांचा (Terrorist) पुण्यात स्फोट घडवण्याचा कट होता, अशी धक्कादायक माहिती समोर आलीय. दहशतवाद विरोधी पथकाने आणखी एका आरोपीला गोंदियातून (Gondia) अटक केलीय. पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांना या दहशतवाद्यानं गोंदियात राहण्यासाठी आसरा दिला होता. तर या प्रकरणातला आणखी एक मुख्य दहशतवादी शाहनवाजचा शोध सुरू आहे. कोंढवा पोलिसांच्या ताब्यातून पळालेला दहशतवादी शाहनवाज  अल सफा या इसिसच्या (ISIS) धर्तीवर सुरू झालेल्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. केंद्रिय तपास यंत्रणा आणि एटीएस शाहनवाजच्या शोधात आहेत . आतापर्यंत या प्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आलीय. शाहनवाजची गर्लफ्रेंड अल्फिया आणि तिच्या वडिलांना NIA ने अटक केलीय..पुणे स्टेशन आणि बिहार आशा दोन ठिकाणी फरार दहशतवाद्याचं लोकेशन सापडलं आहे..कोंढवामधल्या घरातून पळताना दहशतवाद्यानं सोबत बंदुका घेतल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे बॉम्बस्फोट घडवण्याचा कट
पुणे पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचे समोर आलं आहे. महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान आणि महम्मद युनूस महम्मद हे दोघे पुण्यात बॉम्बस्फोट घडवार असल्याचं एटीएसच्या तपासात निष्पन्न झालं आहे. धक्कादायक म्हणजे या दोघांनी मिळून सातारा पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील जंगलांमध्ये जाऊन बॉम्बस्फोट घडवण्याचे प्रशिक्षण आणि चाचणी देखील केली होती अशी माहिती समोर आली आहे. 18 जुलै रोजी या दोन्ही दहशतवाद्यांना पुण्यातील कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाचे सगळे वरिष्ठ अधिकारी आज दाखल झालेले आहेत. 


हे दोघेही गोंदिया जिल्ह्यात असताना त्या ठिकाणी आणखी एका दहशतवादाने त्यांना आसरा दिला होता तसेच त्यांना आर्थिक मदत देखील केली होती. या दहशतवाद्याला महाराष्ट्र एटीएसने गोंदियातून अटक केली आहे. त्याच्या संपर्कात इतर कोण होते याचा तपास एटीएस कडून सुरु आहे.


लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कात
पुण्यातील कोथरुडमध्ये दोन दहशतवाद्यांना (Terrorist) अटक करण्यात आली होती. पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना गाडी चोरताना दोन आरोपी पोलिसांना सापडले. त्यानतंर ते ददहशतवादी असल्याचा मोठा खुलासा झाला होता. हे दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचा (Lashkar-e-Taiba) कुख्यात दहशतवादी तसंच कमांडर फैयाज काग्झी याला फॉलो करीत असल्याचं धक्कादायक खुलासा पोलिसांनी केलाय. पोलिसांनी जप्त केलेल्या त्यांच्या लॅपटॉपमध्ये काग्झी याच्या अनुषंगाने असलेली माहिती आढळून आल्याचं सूत्रांनी सांगितले. काग्झी हा महाराष्ट्रासह देशातील विविध देशविघातक कृत्यांत सहभागी होता. 


पुण्यात दहशतवादी ट्रेनिंग स्कूल
एप्रिल महिन्यात पुण्यात एका शाळेत दहशतवादी बनण्याचं ट्रेनिंग दिलं जात असल्याचं समोर आलं होतं. पुण्यातील कोंढवा परिसरात एका शाळेत इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण दिलं जात होतं अशी धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानतंर एनआयएने चौथा आणि पाचवा मजला सील केला.  या मजल्यांवर देशविघातक कारवाया सुरू होत्या अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या इमारतीत कारवाई केलेल्या मजल्यांवर शस्त्र आणि हल्ल्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं अशी माहिती एनआयएने दिली.