महाराष्ट्रातील 434 आयटीआय कॉलेजमध्ये संविधान मंदिर; भारतरत्न डॉ.आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहचणार
Samvidhan Mandir: उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिर लोकार्पण सोहळा पार पडला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संविधान मंदिराच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहचतील ,अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.
Inauguration of Constitution Temple : कौशल्य विकास विभागाअंतर्गत 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिर लोकार्पण झाला. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनकड,केंद्रीय मंत्री रामदास आठवले, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आणि राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन उपस्थित होते.
जागतिक लोकशाही दिनाचे औचित्य साधून संविधान मंदिर लोकार्पण होत आहे. भारतरत्न डॉ.आंबेडकर यांचे विचार संविधान मंदिराच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहचतील ,असं मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं. राज्यातील आयटीआयमध्ये संविधान मंदिर लोकार्पण होत आहे,याचा मला अभिमान आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय.
आरक्षण भारताचा आत्मा आहे,संविधानाचा आत्मा आहे.... मात्र,सवैधानिक पदावर बसलेली व्यक्ती परदेशात जाऊन आरक्षणविरोधी वक्तव्य करतात,अशी टीका उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी राहुल गांधींवर केलीय. भारताची राज्यघटना वैशिष्ट्यपूर्ँ आहे. भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जागृतीसाठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहेत.