पुणे : DS Kulkarni granted bail by Pune court : बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना ग्राहकांची फसवणूक केल्याचे प्रकरणात पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. ग्राहकांकडून पैसे घेतल्यानंतरही त्यांना फ्लॅटचा ताबा न दिल्याचे हे प्रकरण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या तीन वर्षांपासून डीएसके दाम्पत्य तुरुंगात होतं. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात खटला सुरु आहे. आकर्षक परतावा देण्याच्या नावाखाली डीएसके यांनी हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात देखील त्यांनी जामीनासाठी अर्ज केला असून त्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 


डीएस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना त्यांच्यावर 2016 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघांवर अनेक गुन्हे दाखल असून त्याबाबतचे खटले सुरु असल्याने डीएसके पती-पत्नींना तुरुंगातच रहावं लागणार आहे, असे सांगितले जात आहे.


डीएसके कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने फ्लॅट खरेदीदारकांकडून आगाऊ रक्कम घेतली मात्र, फ्लॅटबा ताबा दिला नव्हता. या सर्व घटनेत कुलकर्णींना 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याआधी 2018 पासून ते न्यायालयीन कोठडीत होते. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.   


डीएसके, त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आणि त्यांच्या विविध कंपन्यांवर ठेवीदारांची फसवणूक आणि इतर विविध कलमांनुसार देशात सुमारे 450 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, अंमलबजावणी संचलनालय (ED), सिरीअस फ्रॉड इनव्हेस्टिगेटिंग एजन्सी अशा तपास यंत्रणा करीत आहेत. त्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता कमी आहे.