गुड न्यूज! मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर
Mumbai Ahmedabad Bullet Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच नागरिकांच्या सेवेत येणार आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.
Mumbai Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासंबंधी एक गुड न्यूज समोर येतेय. नवी मुंबईमध्ये 394 मीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. नेशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने सोमवारी याबाबत घोषणा केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घणसोलीमध्ये अतिरिक्त बोगदा पूर्ण झाल्यामुळं महाराष्ट्रात वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा दरम्यानचा 21 किमी लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाला गती मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एटीआयटीसाठी खोदकाम 6 डिसेंबर 2023 साठी सुरू झाले होते. 394 मीटर लांबीपर्यंत संपूर्ण खोदकाम सहा महिन्यांच्या आत झाले होते. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली 27,515 किलोग्रॅम विस्फोटकांसह 214 विस्फोट घडवण्यात आले. सुरक्षित उत्खनन करण्यात यावे यासाठी उच्चस्तरीय उपकरणांचा वापर करण्यात आला.
या पद्धतीमुळं काम होईल सुलभ
26 मीटर खोल झुकलेला आदित न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा वापर करून अंदाजे 3.3 किमी लांबीचा बोगदा तयार करण्यास सुलभ होणार आहे. प्रत्येक बाजूला सुमारे 1.6 मीटरचा बोगदा बांधून, एकाच वेळी प्रवेश प्रदान करून हे साध्य केले जाईल. बुलेट ट्रेन प्रकल्पात एकूण 21 किलोमीटरचा बोगदा बांधण्यात येणार आहे. यातील 16 किमीचा बोगदा बोरिंग मशीनने खोदण्यात येणार आहे, तर उर्वरित 5 किमीचा बोगदा NATM (न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड) वापरून बांधण्यात येणार आहे.
21 किमी बोगद्याचे काम प्रगतीपथावर
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने दिलेल्या माहितीनुसार, BKC ते शिळफाटा येथील मुंबई बुलेट ट्रेन स्टेशनला जोडणाऱ्या 21 किमी लांबीच्या बोगद्याचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या बोगद्याचा सुमारे 7 किलोमीटर भाग ठाणे खाडीत समुद्राखाली असणार आहे. सध्या घणसोलीजवळील बीकेसी, विक्रोळी आणि सावली येथे बांधकाम सुरू आहे. हे टनेल बोरिंग मशीन्स (TBM) वापरून 16 किमी लांबीचा बोगदा तयार करण्यास मदत करतील.
मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी सुरू होणार
. 2026 पर्यंत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. बुलेट ट्रेनमुळं मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांतील अंतर फक्त 2 तासांत येणार आहे.मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडोरवर साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, बिलिमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई अशी स्थानक असणार आहेत. देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये 690 प्रवासी प्रवास करु शकतात. म्हणजेच एका ट्रेनमध्ये 10 कोच असू शकतात.