पुणे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर गावात राहणाऱ्या एका दोन वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे. या मुलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी ही मुलगी आईसोबत जवळच्या रेडिओलॉजिस्ट डॉक्टरकडे गेली होती. कोरोना रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरला देखील कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, शिवाय दोन वर्षीय चिमुरडीला आणि तिच्या आईला क्वरंटाइन करण्यात  आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनावर ग्राउंड रिपोर्ट केल्यानंतर डॉक्टरला देखील कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे, चिमुरडीच्या आईचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. प्रशासनाच्या सांगण्यानुसार काही दिवसांनंतर पुन्हा आई आणि मुलीची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. 


सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामध्ये मुंबई आणि पुणे रेड झोनमध्ये आहे. तर काही शहर कोरोना मुक्त देखील झाली आहेत. पण त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून ३६४८ झाली आहे. शनिवारी राज्यात ३२८ नवे रुग्ण आढळले. तर ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या २११ झाली आहे. तर आतापर्यंत 365३६५ रुग्ण बरे झाले आहेत.