Trainee IAS officer Puja Khedkar Case :  माजी वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS आधिकारी पूजा खेडकर हिनं पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात लिहलेलं पत्र झी २४ तासच्या हाती आलं आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर या पत्रात लैंगिक छळाचे आरोप करण्यात आलेले नाहीत. मात्र ⁠दिवसेंनी सातत्याने अपमानास्पद वागणूक दिल्याचं पत्रात म्हंटलंय. तसंच त्यांनी सरकारला पाठवलेला अहवाल व्हायरल झाल्यानं आपली बदनामी झाल्याचं तिनं पत्रातून म्हंटलंय. या अहवालामुळे आपण उद्दाम आधिकारी असल्याची प्रतिमा तयार झाल्याचा आरोप तिनं पत्रातून केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



वादग्रस्त माजी ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी आज दिल्ली हायकोर्टाने नवीन तारीख दिली आहे.  आता 12 ऑगस्टली सुनावणी होणार आहे. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. पटियाला हाऊस न्यायालयानं 1 ऑगस्टला पूजा खेजकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.  त्यानंतर पूजा खेडकरनं दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता 12 ऑगस्टली  सुनावणी होणार आहे. 


पूजा खेडकरांचे वडिल दिलीप खेडकरांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल


पूजा खेडकरांचे वडिल दिलीप खेडकरांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सरकारी कामकाजात अडथळा आणल्याच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.  पुण्यातील बंदगार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय,. दिलीप खेडकर यांच्याविरुध्द सरकारी कामकाजात अडथळा आणल्याची तक्रार तहसीलदार दिलीप आकडे यांनी बुधवारी पोलिसांकडे केली होती. दिलीप खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पूजाला स्वतंत्र केबिन द्यावं, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता असं तक्रारीत नमुद करण्यात आलंय.