औरंगाबाद : knife attack on youth at Aurangabad : सोशल मीडियावर स्टेट्स ठेवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. त्याच्याविरोधा गुन्हा दाखल झाला आहे. तर 12 जणांना आक्षेपार्ह स्टेट्स ठेवले म्हणून एका तरुणावर हल्ला चढवला. यावेळी तरुणाला चाकूने भोसकण्याचा प्रयत्न झाला. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेट्स  (Controversial status on social media) ठेवल्यावरुन एका तरुणाला चाकूने भोसकून जखमी केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापुरात आज घडली. याप्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. शिवाय ज्या तरुणाने स्टेटस ठेवले होते त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


चाकूने हल्ल्यात जखमी झालेला तरुणाला औरंगाबादमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. प्रेम पवार असं त्या जखमी तरुणाचे नाव आहे. प्रेम पवार याने आपल्या सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेट्स ठेवले होते. ते स्टेट्स काढून टाक असं काही तरुणानी सांगितले. मात्र,  त्यांने स्टेट्स काढले नसल्याने 12 तरुणानी त्याच्यावर हल्ला केला. चाकूने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला.