भाऊ कदमच्या पनवेल महापालिकेच्या स्वच्छता दूत निवडीवरून वाद
पनवेल महानगरपालिकेचा स्वछता दूत म्हणून अभिनेते भाऊ कदम यांची निवड करण्यात आली होती. परंतु यावरून प्रशासन आणि सत्ताधा-यांमध्ये वाद सुरु झाला आहे.
मुंबई : पनवेल महानगरपालिकेचा स्वछता दूत म्हणून अभिनेते भाऊ कदम यांची निवड करण्यात आली होती. परंतु यावरून प्रशासन आणि सत्ताधा-यांमध्ये वाद सुरु झाला आहे.
भाऊ कदम यांची स्वछता दूत म्हणून नियुक्ती करताना मनपा प्रशासनाने विश्वासात घेतलं नसल्याने सत्ताधा-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासन मनमानी पद्धतीने काम करत असून लोकप्रितिनिधिंचा अपमान करत आहे असा आरोप सत्ताधारी नगरसेवकांनी केलाय. तर प्रशासन आणि सत्ताधारयांमध्ये कुठलाही वाद नसून प्रत्यक्षात भेटून यापुढे असा वाद होणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया उपायुक्तांनी व्यक्त केली.
नव्याने स्थापन झालेल्या पनवेल मनपामध्ये आयुक्त सुधाकर शिंदे आणि सत्ताधारी यांच्यात अनेक मुद्यांवर मतभेद समोर आले आहेत. प्रशासनानं नगरसेवकांना पनवेलमध्ये प्रशिक्षण देण्याची तयारी केली होती. परंतु नगरसेवकांनी हे प्रशिक्षण मसुरीला जाऊन घेण्याचा अट्टाहास केला होता.