धुळे: लेखिकेची कोणत्याही प्रकारे पूर्वसंमती न घेता त्यांची नाटिका थेट पाट्यपुस्तिकेत अभ्यासक्रमासाठी छापण्याचा पराक्रम बालभारतीने केला आहे. विविध कारणांमुळे बालभारती आगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यातच हे प्रकरण पुढे आल्याने ही बालभारती आहे की, वादभारती, असा प्रश्न चर्चिला जाऊ लागला आहे. धुळे येथील लेखिका प्रभा बैकर यांच्या नाटिकेबाबत हा प्रकार घडला आहे.  प्रभा बैकर यांची 'आपण सारे एक' ही नाटिका बालभारतीने पाठ्यपुस्तिकेत समाविष्ट केली आहे.


योग्य ते मानधन मिळावे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, बालभारतीच्या या उपद्व्यापाबद्धल झी २४ तासशी बोलताना लेखिका प्रभा बैकर म्हणाल्या, 'ही नाटिका पाठ्यपुस्तकात समाविष्ट केल्याचा मला आनंद आहे. मात्र, परवानगी घेऊन ही नाटिका अभ्यासक्रमात समाविष्ट झाली असती तर, अधिक आनंद झाला असता'. दरम्यान, बालभारतीच्या परस्पर उद्योगाबाबत बैकर यांनी खंत व्यक्त करत, या नाटिकेचं मानधन मिळावं अशी मागणी प्रभा बैकर यांनी केली आहे.


बालभारती लेखकांना गृहीत धरतं?


बालभारती लेखकांना कसे गृहीत धरतं हे धुळ्यातील लेखिका प्रभा बैकर यांच्या प्रकरणातून पुढे येत आहे.. बैकर यांची परवानगी न घेताच परस्पर बालभारतीनं त्यांचं एक बालनाट्य आठवीच्या अभ्रासक्रमात समाविष्ट करून घेतलंय. विशेष म्हणजे मानधनही देण्यात आलेले नाही. या प्रकारानंतर बैकर यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला.