प्रणव पोळेकर आणि अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास : चिपी विमानतळाच्या (Chipi Airport inauguration) उद्घटनावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udddhav Thackeray) विरुद्ध केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) असा राजकीय सामना पुन्हा एकदा रंगलाय. या उद्घाटनाला मुख्यमंत्री जाणार असल्याचं समजतंय. त्यामुळं दोन्ही कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एका व्यासपीठावर येणार आहेत. (controversy over to inauguartion to chipi airport between cm uddhav thackeray and union minister narayan rane)
 
कोकणातील चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यावरून उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे वाद पुन्हा उफाळून आलाय. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर येत्या 9 ऑक्टोबरला केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Minister of Civil Aviation of India Jyotiraditya Scindia) यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होतंय. त्याआधीच राणे आणि शिवसेनेत (Shivsena) श्रेयवादाचं धूमशान रंगलंय. विमानतळ आपण बांधलं असल्यानं मुख्यमंत्री पाहिजे कशाला, असा सवाल राणेंनी केला. तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच उद्घाटनाचा कार्यक्रम ठरलाय, असं शिवसेनेनं स्पष्ट केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


याचाच अर्थ उद्धव ठाकरे आणि नारायण राणे 9 ऑक्टोबरला एकाच व्यासपीठावर दिसतील. राणेंना झालेल्या अटकेनंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार आहेत... त्यावेळी दोघांमध्ये कसा सामना रंगतो आणि कोण कुणावर प्रहार करतो, याची उत्सूकता राजकीय वर्तुळात आहे.. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मात्र या मुद्यावर समन्वयाची भूमिका घेतलीय..


आतापर्यंत अनेकवेळा चिपी विमानतळ सुरू करण्याची घोषणा झाली. निदान आता ९ ऑक्टोबरला तरी ठरलेल्या मुहूर्तावर विमानसेवा सुरू होणार का, याच्याकडे कोकणवासीयांच्या नजरा लागल्या आहेत. भांडू दे, पण नांदू दे,  अशीच काहीशी कोकणी जनतेची भावना झालीय.